Published Feb 13, 2025
By Harshada Jadhav
Pic Credit - pinterest
आपण रोज वेगवेगळ्या प्रकारची फळं खातो.
काही फळांमध्ये बिया असतात तर काही फळांना साली असतात.
कलिंगड, पपई यासारखी फळ त्यांच्या बियांसाठी ओळखली जातात.
पण तुम्हाला असं फळ माहित आहे का ज्यामध्ये बिया आणि साली दोन्ही नसतात.
आम्ही तुती फळाबद्दल बोलत आहोत.
तुती त्याच्या अद्वितीय चव आणि पौष्टिक गुणधर्मांसाठी ओळखले जाते.
या फळाला बिया नसतात आणि त्याची सालही नसते.
तुती हे पोषक तत्वांचा खजिना आहे.
यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, लोह, कॅल्शियम, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात.
तुतीमध्ये असलेले फायबर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते.
तुतीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स त्वचा निरोगी आणि तरुण ठेवण्यास मदत करतात.