Written By: Harshada Jadhav
Source: Pinterest
कॅब सेवा प्रदाता कंपनी उबरने त्यांचा 9 वा वार्षिक लॉस्ट अँड फाऊंड निर्देशांक तयार केला आहे.
यानुसार, आता तुम्हाला अशा शहराबद्दल सांगणार आहोत, जिथली लोकं कॅबमध्ये सर्वात जास्त सामान विसरतात.
पूर्वी, राजधानी दिल्ली सर्वात विसराळू शहरांपैकी एक होती.
आता दिल्ली या यादीत दुसऱ्या स्थानावर घसरली आहे.
उबरच्या अहवालानुसार, देशातील सर्वात विसराळू शहर म्हणजे स्वप्नांचे शहर, मुंबई.
मुंबईतील प्रवाशांनी प्रवासादरम्यान त्यांच्या कॅबमध्ये काही धक्कादायक गोष्टी सोडल्या.
यामध्ये सोन्याचे बिस्किटे, 25 किलो गाईचे तूप, लग्नाच्या साड्या आणि अगदी स्वयंपाकाच्या वस्तूंचाही समावेश आहे.
उबरच्या मते, लोक शुक्रवार, शनिवार आणि रविवारी कॅबमध्ये सर्वाधिक सामान सोडतात.