Published Oct 04, 2024
By Narayan Parab
Pic Credit - Social Media
या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महारांजांचे हाताचे आणि पायाचे ठसे आहेत आणि येथे शिवरांयाचे मंदिरही आहे.
देवगडमधील कुणकेश्वर मंदिर हे दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखले जाते. मंदिराला सुंदर असा समुद्रकिनारा लाभला आहे.
वेंगुर्ल्यातील समुद्र किनाऱ्याजवळ असलेल्या सागरेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणात येतात.
रेडीचा गणपती हा भाविकांचे श्रध्दास्थान आहे. येथील गणेशमुर्तीही उत्खननात सापडली आहे.
.
मालवणमधील धामापूर तलाव हे नयनरम्य ठिकाण आहे. या तलावाच्या काठावर ऐतिहासिक भगवती देवीचे मंदिर आहे.
सावंतवाडीचा राजवाडा हा शहराची मुख्य ओळख आहे. जवळजवळ 200 वर्षापूर्वीचा हा राजवाडा असून आजही दिमाखात उभा आहे.
मालवणमधील तारकर्ली बीच हा सुंदर आणि नयनरम्य आहे. त्यामुळेच हा बीच पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र आहे.
तारकर्ली बीचला लागूनच देवबाग बीच आहे. याठिकाणी वॉटर स्पोर्ट्स आणि पॅरासिलिंगचा आनंद घेता येतो.