Written By: Trupti Gaikwad
Source: Yandex
बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने बौद्ध धर्माची संबंधित अशी नावं तुम्ही तुमच्या बाळांसाठी ठेऊ शकता.
सम्राट अशोकाची मोठी मुलगी संघमित्रा. हीने बौद्ध धर्माचा जगभर प्रसार केला.
बौद्ध धर्मातील उपासिका म्हणून विशाखाला ओळखलं जातं.
अरहँत म्हणजे मोह माया मत्सर त्यागलेला योगी. दिव्यज्ञान प्राप्ती झाल्यावर बुद्धांना अरहँत अवस्था प्राप्त झाली होती.
मोक्षाकडे नेणारा असा या नावाचा अर्थ होतो. गौतम बुद्धांच्या मुलाचं नाव राहुल होतं.
बुद्धत्वाच्या मार्गावर चालणारा, बुद्धांच्या विचारांचा अंश म्हणजे बुद्धांश
बौद्ध धर्माचे तत्त्वज्ञान स्वतःच्या जीवनात प्रज्वलित करणारा धम्मदीप.
सत्य स्विकारणारा आणि सत्याला सर्वश्रेष्ठ मानणारा म्हणजे तथागत.
बुद्धांची मावशी गौतमी हिने बुद्धांना लहानाचं मोठं केलं. गौतमी ही जगातील पहिली बौद्ध भिक्षुणी आहे.