Published Oct 02, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
नवरात्रीच्या उपवासासाठी खायचे पदार्थ
नवरात्रीच्या 9 दिवसात तुम्हीही व्रत करताय का? आहारात यादरम्यान कोणत्या पदार्थांचा समावेश करावा समजून घ्या
तुम्ही 9 दिवसात जर कोणत्याही पद्धतीचे पीठ वापरणार असाल तर त्यासाठी गव्हाचं नाही तर शिंगाड्याचे पीठ वापरावे
साबुदाणा खिचडी, थालिपीठ, खीर, पराठा यापैकी कोणत्याही पदार्थाचे सेवन तुम्ही करू शकता
.
उपवासात शरीराला एनर्जी गरजेची असून विटामिन्स मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी पेरू, सफरचंद, केळं, सीताफळ अशी फळे खावीत
.
उपवासादरम्यान सैंधव मीठाने तयार केलेल्या भाज्या तुम्ही खाऊ शकता. यात केवळ जीरे, कोथिंबीर, आलं, लिंबू याचा वापर करावा
उपवासादरम्यान बटाटा, काकडी, गाजर या भाज्यांचे सेवन तुम्ही करू शकता, मात्र प्रमाणात करावे
दूध, दही, क्रीम, लोणी, तूप, खवा हे दुधापासून तयार झालेले पदार्थ तुम्ही उपवासादरम्यान ग्रहण करू शकता. यात फॅट्स आणि प्रोटीन असतात
उपवासादरम्यान रताळे खाणे उत्तम. यामुळे शरीराला पूर्ण पोषण मिळते. रताळ्याचा किस, थालिपीठ, खीर अथवा उकडून खावे
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खावे, आम्ही कोणताही दावा करत नाही