गुजरातमध्ये नऊ रात्री पारंपरिक पोशाख परिधान करून गरबा आणि दांडिया खेळून देवीची आराधना केली जाते.
Picture Credit: Pinterest
पश्चिम बंगालमध्ये दुर्गा पूजेला विशेष महत्त्व आहे. भव्य मंडप, कलात्मक मूर्ती, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विशेष पूजा हे उत्सवाचे प्रमुख आकर्षण असते.
Picture Credit: Pinterest
तामिळनाडूमध्ये गोलू परंपरा आहे. देवी देवतांच्या आणि पौराणिक कथांतील पात्रांच्या बाहुल्य पायऱ्यांवर सजवून पूजा आणि भजन केले जाते.
Picture Credit: Pinterest
Picture Credit: Pinterest
विविध फुलांच्या थरांनी सजवलेल्या आकर्षक रचना करून महिला एकत्र येतात आणि पारंपरिक गाणी गात उत्सव साजरा करतात. बथुकम्मा हा तेलंगणातील महिलांचा सर्वांत मोठा आणि पारंपरिक फुलांचा उत्सव आहे.
Picture Credit: Pinterest
म्हैसूर पॅलेसची रोषणाई, सांस्कृतिक कार्यक्रम आणि पारंपरिक मिरवणुका यांमुळे हा उत्सव प्रसिद्ध आहे.
Picture Credit: Pinterest
अनेक ठिकाणी रामायणावर आधारित रामलीला सादर केली जाते. विजयादशमीला रावणाच्या प्रतिमेचे दहन करण्याची परंपरा आहे.
Picture Credit: Pinterest
महाराष्ट्रामध्ये घरांघरामध्ये घटस्थापना, नवरात्रपूजा, उपवास आणि देवीच्या मंदिरांमध्ये दर्शन अशा परंपरांतून उत्सव साजरा केला जातो.
Picture Credit: Pinterest
विजयवाड्यातील कनक दुर्गा मंदिरात नवरात्रीदरम्यान विशेष पूजा आणि धार्मिक कार्यक्रम होतात.