साबुदाणा स्वच्छ धुऊन त्यातील पाणी काढून टाका. साबुदाण्याच्या पातळीपर्यंत पाणी घालून ४ ते ६ तास किंवा साबुदाणा मऊ होईपर्यंत भिजत ठेवा.
Picture Credit: Pinterest
उकडलेले बटाटे सोलून एका भांड्यात चांगले मॅश करा. बटाट्यांमध्ये गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्या.
Picture Credit: Pinterest
भाजलेले शेंगदाणे सोलून मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या. बारीक चिरलेली हिरवी मिरची, जिरे आणि कोथिंबीर तयार ठेवा.
Picture Credit: Pinterest
भिजवलेला साबुदाणा, मॅश केलेले बटाटे, शेंगदाण्याचे कूट, हिरवी मिरची, जिरे, कोथिंबीर आणि मीठ एकत्र करून व्यवस्थित मळून घ्या.
Picture Credit: Pinterest
तयार मिश्रणाचे समान आकाराचे गोळे करा. हाताला थोडे पाणी किंवा तेल लावून गोळे हलके दाबून गोल, चपट्या वड्यांचा आकार द्या.
Picture Credit: Pinterest
कढईत तेल गरम करा. तेल मध्यम गरम झाल्यावर वडे सावधपणे सोडा आणि मध्यम आचेवर सोनेरी व कुरकुरीत होईपर्यंत तळा. वडे वारंवार उलटू नका.
Picture Credit: Pinterest
तळलेले वडे टिश्यू पेपरवर काढून अतिरिक्त तेल निथळू द्या. गरमागरम साबुदाणा वडे हिरवी चटणी किंवा गोड दह्यासोबत सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest