नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीची पूजा केली जाते. या दिवशी देवीला तुपाचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे.
Picture Credit: Pinterest
दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते. देवीला साखर किंवा साखरेपासून तयार केलेला गोड पदार्थ अर्पण केला जातो.
Picture Credit: Pinterest
तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते. या दिवशी दूध, खीर किंवा दुधापासून तयार केलेला गोड नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे.
Picture Credit: Pinterest
चौथ्या दिवशी कूष्मांडा देवीची आराधना केली जाते. देवीला मालपुआ किंवा गोड पदार्थांचा नैवेद्य अर्पण केला जातो.
Picture Credit: Pinterest
पाचव्या दिवशी स्कंदमाता देवीची पूजा केली जाते. या दिवशी देवीला केळी किंवा केळ्यापासून तयार केलेला पदार्थ नैवेद्यात दाखवतात.
Picture Credit: Pinterest
सहाव्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा केली जाते. या दिवशी देवीला मध अर्पण करण्याची परंपरा आहे.
Picture Credit: Pinterest
सातव्या दिवशी कालरात्री देवीची आराधना केली जाते. देवीला गूळ किंवा गुळापासून तयार केलेला गोड पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवतात.
Picture Credit: Pinterest
आठव्या दिवशी महागौरी देवीची पूजा केली जाते. या दिवशी देवीला नारळाचा नैवेद्य अर्पण करण्याची प्रथा आहे.
Picture Credit: Pinterest
नवरात्रीच्या नवव्या दिवशी सिद्धिदात्री देवीची पूजा केली जाते. या दिवशी तिळापासून तयार केलेले पदार्थ नैवेद्यात दाखवला जातो.
Picture Credit: Pinterest