वास्तुशास्त्रात देण्याघेण्याच्या काही गोष्टींबाबत सांगण्यात आले आहे. वास्तुशास्त्रानुसार काही वैयक्तिक अशा गोष्टी आहेत त्या दुसऱ्यांसोबत कधीही शेअर करु नये.
वास्तुशास्त्रानुसार या गोष्टी शेअर केल्याने व्यक्तीवर नकारात्मक प्रभाव पडू शकतो. कोणत्या आहेत त्या गोष्टी जाणून घ्या
वास्तुशास्त्रानुसार लग्नामधील अंगठी कधीही दुसऱ्यासोबत शेअर करु नये. कारण हे मजबूत आणि प्रेमाचे प्रतीक आहे.
असे केल्याने नात्यामधील तणाव आणि समस्या वाढू शकतात. त्याचसोबत याचा परिणाम आर्थिक स्थितीवर देखील होऊ शकतो.
लग्नातील साडी किंवा लेहेंगा यासारखे कपडे देखील इतरांसोबत शेअर करू नयेत.
लग्नाचे कपडे एकमेकांसोबत शेअर केल्याने वैयक्तिक ऊर्जा आणि भावना कमकुवत होऊ शकतात.
वास्तूमध्ये झाडूला विशेष महत्त्व आहे. याला धन आणि सम़ृद्धीचे प्रतीक मानले जाते. यामुळे आपल्या घरातील झाडू दुसऱ्याला कधीही देऊ नये
हातावरचे घड्याळदेखील दुसऱ्याला कधीही देऊ नये. असे केल्याने नकारात्मक प्रभावदेखील वाढू शकतो.
घराचे कुलूप किंवा चावी दुसऱ्याला देणे अशुभ मानले जाते. यामुळे आर्थिक नुकसान, चोरी आणि आर्थिक समस्या उद्भवू शकतात.