Published On 29 March 2025 By Nupur Bhagat
Pic Credit - Pinterest
अनेकदा आपले नेट नीट चालत नसेल अथवा इंटरनेट पॅक संपला असेल तर आपल्याला ऑनलाईन पेमेंट करता येत नाही
मात्र तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही विना इंटरनेट देखील UPI पेमेंट करू शकता
यासाठी तुमचा सक्रिय मोबाईल नंबर UPI सेवांमध्ये नोंदणीकृत असायला हवा
तसेच ज्या व्यक्तीला तुम्हाला पैसे पाठवायचे आहेत त्याचा UPI ऍड्रेस असणे आवश्यक आहे
यासाठी तुमच्या फोनचा डायल ॲप उघडा आणि *99# नंबर डायल करा. फ्लॅश मेन्यू दिसेपर्यंत वाट पाहा
पैसे पाठवण्यासाठी 1 पर्याय निवडा. ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे आहेत त्याचा UPI ऍड्रेस डायल करा
जी रक्कम पाठवायची आहे ती टाइप करा, यानंतर तुम्हाला पिन नंबर एंटर करावा लागेल
पेमेंट पूर्ण झाले की, तुम्हाला तुमच्या फोनवर SMS प्राप्त होईल