कार खरेदीदारांसाठी मोठी बातमी! आता 3 वर्षे PUC ची झंझट संपणार?

Automobile

19 Nov 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

आता BS-VI खासगी कारला तब्बल 3 वर्षांसाठी PUC प्रमाणपत्राची वैधता मिळणार आहे. केंद्र सरकारने नियमांमध्ये महत्त्वाचा बदल केला आहे.

नवीन कारसाठी PUC चा त्रास कमी!

Picture Credit:pinterest

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 13 नोव्हेंबर 2026 रोजी नवीन PUC नियम अधिसूचित केले आहेत. वाहनाचे वय आणि एमिशन स्टँडर्डनुसार प्रमाणपत्राची मुदत ठरणार आहे.

केंद्र सरकारचा मोठा निर्णय!

Picture Credit:pinterest

BS-VI खासगी वाहनाचे वय पहिल्या नोंदणीपासून 6 वर्षांपर्यंत असेल, तर PUC प्रमाणपत्र 3 वर्षे वैध राहणार आहे.

नवीन कारला किती वर्षे PUC वैध?

Picture Credit:pinterest

BS-VI खासगी कारचे वय 6 वर्षांपेक्षा जास्त आणि 10 वर्षांपर्यंत असल्यास दरवर्षी PUC प्रमाणपत्राचे नूतनीकरण करावे लागेल.

6 ते 10 वर्षे जुन्या कारसाठी काय नियम?

Picture Credit:pinterest

BS-VI खासगी कार 10 वर्षांपेक्षा जुनी असल्यास दर 6 महिन्यांनी PUC प्रमाणपत्राचे नूतनीकरण करावे लागणार आहे.

10 वर्षांपेक्षा जुन्या कारसाठी नियम कडक!

Picture Credit:pinterest

BS-VI व्यावसायिक वाहनांना 6 वर्षांपर्यंत 2 वर्षांची PUC वैधता मिळेल. 6 ते 10 वर्षांच्या वाहनांसाठी 1 वर्ष, तर 10 वर्षांपेक्षा जुन्या वाहनांसाठी 6 महिने वैधता असेल.

कमर्शियल वाहनांसाठीही नवे नियम!

Picture Credit:pinterest

BS-I, BS-II आणि BS-III वाहनांसाठी PUC प्रमाणपत्राची वैधता 3 महिने असेल. तर BS-IV वाहनांसाठी ही मुदत 6 महिने निश्चित करण्यात आली आहे.

जुन्या BS मॉडेलच्या वाहनांचे काय?

Picture Credit:pinterest

जुने PUC प्रमाणपत्र लगेच बदलणार नाही. नवीन नियम लागू झाल्यानंतर पहिल्यांदा नूतनीकरण करताना सुधारित वैधता लागू होईल.

आधीच PUC काढले असेल तर?

Picture Credit:pinterest

नियमांनुसार प्रत्येक वाहनाकडे वैध PUC प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. अधिकृत अधिकाऱ्यांनी मागणी केल्यास ते दाखवावे लागेल. त्यामुळे आपल्या वाहनाचे BS मानक आणि नोंदणीची तारीख तपासायला विसरू नका.

PUC प्रमाणपत्र जवळ ठेवणे आवश्यक!

Picture Credit:pinterest