केळी आरोग्यासाठी फायदेशीर असतात. ते शरीरासाठी थंड असते. त्यामुळे हे खाणे सर्वांसाठी चांगले मानले जात नाही. हिवाळ्यात केळी कोणी खाऊ नये, जाणून घ्या
वारंवार सर्दी खोकला यांसारख्या समस्या असतात त्यांना हिवाळ्यात केळी खाल्ल्याने समस्या वाढू शकतात. कारण यामुळे कफ वाढू शकतो.
कफ, आस्थमा किंवा श्वासाशी संबंधित आजार असलेल्यांनी हिवाळ्यात केळी खाऊ नये. यामुळे छातीत रक्तसंचय आणि कफची समस्या वाढू शकते.
ज्या लोकांना पचनक्रिया कमकुवत आहे किंवा ज्यांना गॅस आणि अपचनाचा त्रास आहे त्यांनी हिवाळ्यात केळी खाणे टाळावे. कारण ते पचायला जड असू शकते.
ज्यांना सांधेदुखी किंवा संधिवाताचा त्रास आहे त्यांच्यासाठी हिवाळ्यात केळी खाल्ल्याने वेदना वाढू शकतात. थंड स्वभावामुळे, सूज येऊ शकते.
ज्या लोकांचा वारंवार घसा खराब होतो अशा लोकांनी हिवाळ्यात केळी खाऊ नये. कारण यामुळे घशाची समस्या वाढू शकते.
ज्या लोकांना हिवाळ्यात खूप थंडी वाजते किंवा त्यांचे हात पाय थंड पडतात त्या लोकांनी केळी खाऊ नये. यामुळे शरीराला आणखी थंडावा जाणवतो.