हिवाळ्यामध्ये मुळ्याचे सेवन करणे फायदेशीर आहे. तुमच्या शरीरातील उर्जा वाढवते. यामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने देखील असतात.
मुळा आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. दरम्यान हे खाण्याचे काही तोटे देखील आहेत. मुळा खाण्याचे तोटे जाणून घ्या
मुळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, फायबर, व्हिटॅमिन बी 6, मॅग्नेशियम, कॅल्शियम, आयरन इत्यादी प्रथिने असतात
ज्या लोकांना पित्ताची समस्या आहे त्यांनी मुळा खाऊ नये. त्यामध्ये असे काही गुण असतात की त्यामुळे पित्याची समस्या वाढू शकते. यावेळी पहिले डॉक्टरांचा सल्ला घ्या.
ज्या लोकांचा रक्तदाब नेहमी कमी असतो अशा लोकांनी मुळा खाऊ नये. कारण त्यामध्ये पोटॅशियम असते. दुसरी शरीरातील सोडियम कमी करतो आणि रक्तदाब कमी करण्यास मदत करतो.
मुळ्यामध्ये गोईट्रोजन नावाचे एक तत्त्व आहे. ज्यामुळे थायरॉईडची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे ज्यांना थायरॉईडची समस्या आहे अशा लोकांनी मुळा खाऊ नये
ज्या लोकांना मधुमेह आहे आणि ज्यांना खायला आवडतो त्या लोकांनी मर्यादित प्रमाणात खावे. जास्त प्रमाणात खाल्ल्यास मधुमेह वाढू शकतो.
ज्या लोकांना वारंवार पोटात गॅस होणे, अपचन यांसारख्या समस्या आहेत अशा लोकांनी मुळा खाऊ नये. यामुळे पोटाची समस्या उद्भवू शकते.