Nokia ब्रँडअंतर्गत चार नवीन फीचर फोन सादर करण्यात आले आहेत. पारंपरिक Keypad डिझाइनसोबत आधुनिक AI फीचर्स देण्यावर कंपनीने भर दिला आहे.
Picture Credit: HMD
या फोनमधील Dedicated AI Button च्या मदतीने व्हॉइस कमांडद्वारे अलार्म सेट करणे, रिमाइंडर लावणे, कॉल करणे किंवा इतर दैनंदिन कामे अधिक सोपी होतात.
Picture Credit: HMD
नवीन फोनमध्ये 4G नेटवर्क, Bluetooth, USB Type-C पोर्ट, FM Radio आणि 3.5mm हेडफोन जॅक यांसारखी आवश्यक फीचर्स देण्यात आली आहेत.
Picture Credit: HMD
सर्व मॉडेल्समध्ये 1450mAh रिमूव्हेबल बॅटरी दिली आहे. कमी चार्जिंगमध्येही फोन बराच वेळ वापरता येईल, असा कंपनीचा दावा आहे.
Picture Credit: HMD
काही मॉडेल्समध्ये 2.8-इंच, तर काहींमध्ये 2.4-इंच डिस्प्ले मिळतो. तसेच microSD कार्डद्वारे स्टोरेज वाढवण्याचाही पर्याय उपलब्ध आहे.
Picture Credit: HMD
ज्यांना सोशल मीडियापेक्षा कॉलिंग, मेसेजिंग, लांब बॅटरी बॅकअप आणि सोपा वापर महत्त्वाचा वाटतो, त्यांच्यासाठी ही नवीन Nokia सीरिज चांगला पर्याय ठरू शकते.
Picture Credit: HMD
या फोनची जागतिक स्तरावर घोषणा करण्यात आली आहे. भारतातील लॉन्च आणि किंमतीबाबत कंपनीकडून लवकरच अधिकृत माहिती अपेक्षित आहे.
Picture Credit: HMD