सोया किमा घरी कसा तयार करायचा?

Life style

21 October, 2025

Author:  नुपूर भगत

सोया चंक्स पाण्यात 10 मिनिटे भिजवून ठेवा. नंतर पाणी गाळून नीट दाबून अतिरिक्त पाणी काढून टाका.

सोयाबीन भिजवा

Picture Credit: Pinterest

कढईत तेल गरम करून त्यात कांदा घालून सोनेरी होईपर्यंत परतून घ्या.

कांदा परता

Picture Credit: Pinterest

आलं-लसूण पेस्ट घालून काही सेकंद परतवा, नंतर टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत शिजवा.

पीठ मळा

Picture Credit: Pinterest

हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि मीठ घालून मसाले नीट परतून घ्या.

मसाले घाला

Picture Credit: Pinterest

आता त्यात भिजवलेला सोया कीमा आणि मटार घालून चांगलं मिक्स करा.

सोया किमा

Picture Credit: Pinterest

अर्धा कप पाणी घालून झाकण ठेवून मध्यम आचेवर 8–10 मिनिटे शिजवा, जोपर्यंत मसाले आणि कीमा एकजीव होतात.

मध्यम आचेवर शिजवा

Picture Credit: Pinterest

शेवटी वरून कोथिंबीर घालून सजवा आणि गरम गरम सोया कीमा भात, पोळी किंवा पराठ्यासोबत सर्व्ह करा.

कोथिंबीर घाला

Picture Credit: Pinterest