ASUS ने ग्राहकांसाठी Part Price Checker हे ऑनलाइन टूल उपलब्ध केले आहे. यामुळे लॅपटॉपच्या स्पेअर पार्ट्सची किंमत सर्व्हिस सेंटरमध्ये जाण्यापूर्वीच समजू शकते.
Picture Credit: Pinterest
हे टूल लॅपटॉपमधील विविध ओरिजिनल पार्ट्सची अंदाजे किंमत दाखवते. त्यामुळे दुरुस्तीचा खर्च आधीच समजतो आणि निर्णय घेणे सोपे होते.
Picture Credit: Pinterest
ASUS च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन आपल्या लॅपटॉपचा Serial Number टाका. त्यानंतर संबंधित मॉडेलसाठी उपलब्ध स्पेअर पार्ट्सची माहिती आणि किंमत दिसते.
Picture Credit: Pinterest
या टूलद्वारे स्क्रीन, बॅटरी, कीबोर्ड, टचपॅड, चार्जिंगशी संबंधित पार्ट्स आणि इतर ओरिजिनल स्पेअर पार्ट्सची किंमत पाहता येते.
Picture Credit: Pinterest
रिपेअरचा खर्च आधीच कळत असल्याने अनपेक्षित खर्चाचा धक्का बसत नाही. तसेच खर्चाची तुलना करून योग्य निर्णय घेता येतो.
Picture Credit: Pinterest
ओरिजिनल पार्ट्सची अधिकृत किंमत उपलब्ध असल्याने जास्त पैसे आकारले जात आहेत का, याची ग्राहक स्वतः पडताळणी करू शकतात.
Picture Credit: Pinterest
सर्व्हिस सेंटरमध्ये जाण्यापूर्वीच आवश्यक माहिती मिळाल्याने वेळ वाचतो आणि दुरुस्तीचे नियोजन करणे सोपे होते.
Picture Credit: Pinterest
ASUS आणि ROG लॅपटॉप वापरणाऱ्या ग्राहकांसाठी हे टूल विशेष उपयुक्त आहे. लॅपटॉप दुरुस्ती अधिक पारदर्शक आणि सोपी करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
Picture Credit: Pinterest