आठवड्याचे सातही दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित आहे. सोमवारचा दिवस महादेवांना समर्पित आहे. या दिवशी शिवलिंगाची पूजा केली जाते.
सोमवारच्या दिवशी महादेवांची पूजा केल्याने आनंद आणि समृद्धी येते. याव्यक्तिरिक्त दिवसरात्र प्रगती होते. तसेच महादेवांची पूजा करावी.
शिवलिंगावर या गोष्टी अर्पण केल्याने आर्थिक समस्या दूर होऊ शकतात, कोणत्या गोष्टी अर्पण कराव्यात जाणून घ्या
शिवलिंगावर उसाचा रस अर्पण केल्याने महादेव प्रसन्न होतात. त्यामुळे तुम्हाला नशिबाची अपेक्षित साथ मिळते.
हिंदू धर्मात तांदूळाला विशेष महत्त्व आहे. अशावेळी तुम्ही शिवलिंगावर तांदूळ अर्पण केल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते.
जर तुम्हाला आर्थिक स्थिती सुधारायची असेल तर शिवलिंगावर दूध अर्पण करावे.
शिवलिंगावर गंगाजल अर्पण केल्याने आर्थिक संकटांतून सुटका होऊ शकते. याशिवाय कुटुंबातील सदस्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होते.
शिवलिंगावर या गोष्टी अर्पण करताना लक्षात ठेवा की मनात कोणत्याही प्रकारचा नकारात्मक भाव नसावा.