Published Jan 15, 2025
By Mayur Navle
Pic Credit - iStock
भारतात अनेक मद्यप्रेमी आहेत. ज्यामध्ये अनेक जणांना रम प्यायला आवडते.
प्रत्येक मद्यप्रेमीला ओल्ड मंकचे नाव ठाऊक असेल. पण या रमला हे नाव कसे पडले त्याबद्दल तुम्हाला माहीत आहे का?
ओल्ड मंक रम ही भारतीय कंपनी मोहन मिकिन लिमिटेड बनवते.
ओल्ड मंकचे जनक म्हणून ब्रिगेडियर कपिल मोहन आहे असे सांगितले जाते. परंतु, याचे खरे जनक कर्नल वेद रतन मोहन होते.
जेव्हा वेद रतन मोहन युरोपला गेले होते तेव्हा तेथील बेनेडिक्टिन संतांच्या जीवनशैली आणि मद्य बनवण्याच्या पद्धतीने प्रभावित झाले.
बेनेडिक्टिन संतांनी इटलीमध्ये अनेक मठ बनवले होते. या संतांमुळेच रम बनवण्याची पद्धत इंग्लंड, जर्मनी, डेन्मार्क आणि फ्रान्सला पोहचली.
बेनेडिक्टिन संतांना हाय क्वालिटी बियर बनवण्यासाठी ओळखले जाते.