Published August 18, 2024
By Harshada Jadhav
सूर्य सूर्यमालेच्या केंद्रस्थानी आहे. पृथ्वी व सूर्यमालेतील इतर ग्रह सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतात.
सूर्यमालेत एकूण 8 ग्रह आहेत. आपण सर्व मनुष्य देखील या सूर्यमालेचा एक भाग आहोत.
.
हा ग्रह सूर्याच्या सर्वात जवळ आहे. त्यामुळे या ग्रहावर जीवन शक्य नाही.
हा ग्रह सूर्यापासून दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात जवळचा ग्रह मानला जातो.
पृथ्वी सूर्यापासून तिसऱ्या क्रमांकावर आहे. पृथ्वीला सूर्याभोवती फिरायला सुमारे ३६५ दिवस लागतात .
मंगळ हा सूर्यमालेतील दुसरा सर्वात लहान ग्रह आहे.
हा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे. या ग्रहाचे ७९ उपग्रह आहेत.
शनी ग्रह सूर्यापासून सहाव्या क्रमांकावर आहे. या ग्रहाचे सुमारे ८२ उपग्रह आहेत.
युरेनसचा शोध विल्यम हर्सिलने १७८१ मध्ये लावला होता.
वरुण ग्रहाचे 13 उपग्रह आहेत. हा ग्रह सूर्यापासून 8व्या स्थानावर आहे.