Published August 3, 2024
By Shubhangi Mere
क्वार्टर फायनलमध्ये त्याने चायनीज तैपेईच्या दिग्गज खेळाडू चौ तिएन-चेनला पराभूत करून सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
क्वार्टर फायनलमध्ये पहिला खेळ लक्ष्यने गमावला होता, त्यानंतर त्याने हा सामना चायनीज तैपेईच्या विरुद्ध १९-२१, २१-१५, २१-१२ असा जिंकला.
.
भारताचे किदांबी श्रीकांत आणि परुपली कश्यप यांनी क्वाटर फायनलपर्यंत ऑलिम्पिकमध्ये खेळी खेळली होती. परंतु सेमीफायनलमध्ये प्रवेश करून लक्ष्य सेनने इतिहास रचला आहे.
लक्ष्यने साखळी सामन्यांमध्ये एकही सामना न गमावता तीनही सामन्यांमध्ये विजय मिळवून राऊंड ऑफ १६ मध्ये प्रवेश केला होता.
राऊंड ऑफ १६ मध्ये त्याने भारताचा अनुभवी बॅडमिंटनपटू आणि त्याचा रूम पार्टनर एचएस प्रणॉय याला पराभूत करून त्याने क्वार्टर फायनल गाठली होती.
जागतिक क्रमवारीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या जोनाथन क्रिस्टीला सलग दोन गेममध्ये पराभूत करून सर्वात मोठा विजय मिळवला.
जागतिक क्रमवारीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या व्हिक्टर एक्सेलसेन या डेन्मार्कच्या खेळाडूंचे आव्हान लक्ष्य सेन समोर सेमीफायनलमध्ये असणार आहे.