इलेक्ट्रिक कार असो की पेट्रोल कार गाडीचा लुक कायमच क्लास असला की ग्राहक फिदा होतातच.
Picture Credit: Pinterest
मार्केटमध्ये नुकतंच BYD Sealion 7 चं स्पेशल एडिशन लॉन्च करण्यात आलं आहे.
इलेक्ट्रिक SUV सेगमेंटमध्ये BYD Sealion 7 आता आणखी एका खास लुकमध्येआली आहे.
गाडीच्या लुकबरोबरच तिचे फिचर्स देखील कमाल आहेत.
यामध्ये 82 .56 kWh ची ब्लेड बॅटरी दिली आहे, जी एका चार्जवर 542किमी (WLTP सायकलनुसार) पर्यंत रेंज देते.
ही SUV दोन व्हेरियंट्समध्ये येते. परफॉर्मन्स व्हेरियंट 4.5 सेकंदात 0 ते 100 किमी/ताशी ही गाडी वेगाने धावू शकते.
केबिनमध्ये 15.6-इंच रोटेटिंग टचस्क्रीन, क्विल्टेड कप्पा लेदर सीट्स (Quilted Nappa Leather Seats), आणि 128-कलर ॲम्बियंट लायटिंग आहे.
यामध्ये पॅनोरॅमिक ग्लास रूफ, 12-स्पीकर Dynaudio साउंड सिस्टम, आणि 50 W वायरलेस फोन चार्जिंग सारखे फीचर्स आहेत.