www.navarashtra.com

Published Nov 5,  2024

By  Harshada Jadhav

वैमानिकांना दाढी ठेवण्यास मनाई का आहे? जाणून घ्या कारण

Pic Credit -  pinterest

विमानाचा प्रवास जितका रोमांचक असतो, तितकीच या प्रवासात सावधगिरी देखील आवश्यक असते.

विमान प्रवास

विमान कंपन्यांचे काही नियम आहेत, ज्यांचे वैमानिक, एअर हॉस्टेस आणि प्रवाशांना पालन करणं गरजेचं आहे.

नियम

विमानातील प्रवाशांसाठी आणि क्रू मेंबर्ससाठीही काही नियम आहेत. असाच नियम वैमानिकांनाही लागू होतो.

वैमानिकांनाचे नियम

वैमानिकांसाठी लागू असलेला नियम म्हणजे ते दाढी ठेऊ शकत नाहीत. वैमानिक नेहमी क्लीन शेव्ह ठेवतात.

क्लीन शेव्ह 

विमान उडवण्याशी त्यांच्या दाढीचा काय संबंध? हाच प्रश्न तुमच्या मनात येत असेल.

काय संबंध?

वैमानिकांना फिल्मी हिरोसारखी लांब आणि स्टायलिश दाढी ठेवता येत नाही. याचे कारण सुरक्षेशीही संबंधित आहे

स्टायलिश दाढी

विमान जास्त उंचीवर गेल्यावर केबिनमधील हवेचा दाब कमी होऊ शकतो. अशावेळी प्रवाशांसह सर्व विमान कर्मचाऱ्यांना ऑक्सिजन मास्क घालावे लागतात. 

हवेचा दाब

पायलटलाही ऑक्सिजन मास्क लावावा लागतो. अशा स्थितीत पायलटची दाढी वाढली तर त्याला मास्क घालण्यात अडचण येऊ शकते.

ऑक्सिजन मास्क

वाढलेल्या दाढीमुळे मास्क त्याच्या चेहऱ्यावर नीट बसणार नाही. असे झाल्यास ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे पायलटचा मृत्यूही होऊ शकतो. 

 पायलटचा मृत्यू

पायलटला कोणत्याही प्रकारचा धोका म्हणजे सर्व प्रवाशांच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे त्यांना क्लीन शेव्ह ठेवण्यास सांगितले जाते. 

प्रवाशांना धोका

खाजगी विमान कंपन्यांना त्यांचे वैमानिक आणि इतर कर्मचारी प्रेझेंटेबल दिसावेत म्हणून वैमानिकांना दाढी ठेवण्याची परवानगी नाही.

प्रेझेंटेबल लूक