Published Sept 17, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
7 पिढ्यांचा आशिर्वाद मिळविण्यासाठी इथे करा पिंडदान
17 सप्टेंबर, 2024 पासून पितृपक्षाला सुरूवात झालीये. पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी हे महत्त्वाचे ठरते
भारतामध्ये अशा अनेक पवित्र जागा आहेत, जिथे पितरांच्या मोक्षप्राप्तीसाठी पिंडदान करण्यात येते
उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे गंगानदी किनारी पिंडदान केल्याने मोक्षप्राप्ती होते समजले जाते
.
उत्तराखंडातील हरिद्वार हे पवित्र शहर मानले जात असून गंगाकिनारी आत्म्याच्या शांतीसाठी पितृपक्षात कार्य करण्यात येते
.
बिहारमधील गया येथे फल्गु नदीवर पिंडदान करण्यासाठी देशभरातून लोक येतात, ही अत्यंत पवित्र जागा समजण्यात येते
उत्तराखंडमधील बद्रीनाथमध्ये पिंडदान करणे अत्यंत पुण्याचे समजण्यात येते. अलकनंदा तटावरील ब्रम्हकपाल घाटावर हे कार्य होते
उत्तर प्रदेशातील पवित्र जागा अयोध्येत सरयू नदीकिनारी पितृपक्षात पिंडदान करणे शुभ मानले जाते
आपल्या गुरुजींच्या सांगण्यानुसार आपण पिंडदान करावे, आम्ही कोणताही दावा करत नाही