वास्तुशास्त्रानुसार घरात काही फोटो लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सुख समृद्धी येते. काही फोटोमुळे वास्तूदोष दूर होतो.
गणपती बाप्पाचे फोटो घराच्या मुख्यप्रवेशद्वारावर किंवा लिंविग रुममध्ये उत्तर पूर्व दिशेला लावावे. त्यामुळे वास्तूदोष दूर होतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा येते.
देव्हारा किंवा पैसे ठेवण्याच्या जागी उत्तर दिशेला देवी लक्ष्मीचा फोटो लावा. कमळावर विराजमान असलेला देवीचा फोटो धन आणि समृद्धी आकर्षित करते
राधा कृष्णाचा फोटो बेडरुममध्ये पूर्व दिशेला लावावे. हे प्रेम आणि सद्भावना वाढवते. हे वास्तूदोष दूर करुन कुटुंबामध्ये शांती आणि आनंद येते.
बैठकीच्या खोलीत किंवा कामाच्या ठिकाणी ईशान्य दिशेला ७ घोड्यांचे चित्र लटकवल्याने वास्तुदोष दूर होतात आणि आर्थिक प्रगती वाढते.
वाहणारे पाणी किंवा धबधब्याचा फोटो उत्तर पूर्व दिशेला लावा. यामुळे धन समृद्धीचे प्रतीक आहे. त्यामुळे वास्तूदोष दूर होऊन सकारात्मक ऊर्जा येते.
वास्तूदोषाचे कारण घरामध्ये नकारात्मक ऊर्जा, आर्थिक समस्या आणि कुटुंबामध्ये कलह होऊ शकतो. योग्य फोटो आणि दिशेला लावल्यास वास्तूदोष दूर होतो
नेहमीच स्पष्ट आणि सकारात्मक प्रतिमा देणारी चित्रे निवडा. तुटलेली किंवा दुःखी चित्रे लावू नका. फोटो योग्य दिशेने आणि योग्य उंचीवर ठेवा.