Carens Clavis मध्ये मोठा बदल! कमी किमतीत आले नवे Automatic व्हेरिएंट्स

Automobile

18 Sept 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Kia Carens Clavisच्या ICE रेंजमध्ये नवीन Automatic व्हेरिएंट्स दाखल झाले आहेत. Petrol DCT आणि Diesel Automaticचे पर्याय आता अधिक परवडणाऱ्या ट्रिममध्ये मिळणार आहेत.

Carens Clavis मध्ये मोठा बदल!

Picture Credit:kia

नवीन Automatic व्हेरिएंट्सची एक्स-शोरूम किंमत ₹14.66 लाखांपासून सुरू होते. त्यामुळे Automatic MPV घेऊ इच्छिणाऱ्यांना आणखी एक पर्याय मिळाला आहे.

Automaticची सुरुवात ₹14.66 लाखांपासून

Picture Credit:kia

Carens Clavisमध्ये 1.5-लिटर Turbo-Petrol इंजिनसोबत DCT Automatic उपलब्ध आहे. हा सेटअप आता नव्या आणि तुलनेने कमी किमतीच्या ट्रिममध्येही मिळतो.

Petrol DCTचा नवा पर्याय

Picture Credit:kia

Turbo-Petrol DCTसाठी दोन पर्याय जोडले आहेत. HTE (O) – ₹14.66 लाख HTE (EX) – ₹15.22 लाख

Petrolचे दोन नवे व्हेरिएंट्स

Picture Credit:kia

Diesel पसंत करणाऱ्या ग्राहकांसाठीही नवीन पर्याय देण्यात आला आहे. 1.5-लिटर Diesel इंजिनसोबत Automatic गिअरबॉक्स उपलब्ध आहे.

Diesel Automaticचीही एंट्री

Picture Credit:kia

नवीन Diesel Automatic व्हेरिएंटची किंमत ₹15.82 लाख (एक्स-शोरूम) आहे. त्यामुळे Petrol DCTसोबत Diesel Automaticचीही निवड करता येईल.

Diesel ATची किंमत

Picture Credit:kia

नवीन Automatic व्हेरिएंट्समध्ये Smart Key, Push Button Start आणि Drive Modes मिळतात. याशिवाय Electronic Parking Brake आणि Remote Engine Startसारख्या सुविधाही आहेत.

फीचर्समध्ये काय मिळतं?

Picture Credit:kia

Carens Clavisच्या Petrol रेंजची सुरुवात ₹11.39 लाखांपासून होते. नव्या Automatic व्हेरिएंट्समुळे ग्राहकांना बजेटनुसार अधिक पर्याय मिळाले आहेत.

Carens Clavisची किंमत

Picture Credit:kia

शहरातील रोजच्या वापरासाठी Petrol DCT, तर जास्त रनिंग असणाऱ्यांसाठी Diesel Automatic हा विचार करण्यासारखा पर्याय ठरू शकतो. अंतिम निवड तुमच्या वापर, बजेट आणि ड्रायव्हिंग गरजांवर अवलंबून आहे.

कोणता पर्याय निवडाल?

Picture Credit:kia