वाढत्या प्रदूषणामुळे अनेक जणांना श्वासाच्या समस्या उद्भवतात. अशावेळी घरामध्ये देखील काही लोक मास्क लावून राहतात.
घरातील हवा चांगली ठेवण्यासाठी एअर प्युरिफाय खरेदी करत असाल तर तुमची जास्त पैसे खर्च होऊ शकतात. अशावेळी कोणती रोपे खरेदी करावीत जाणून घ्या
घरातील वातावरण शुद्ध करण्यासाठी एअर प्युरिफायऐवजी घरामध्ये काही रोपे लावा. हे घरातील वातावरण शुद्ध ठेवते आणि सजावटीसाठी देखील चांगले दिसते.
स्नेक प्लांट सोप्या पद्धतीने तुम्ही लावू शकता आणि याला सारखे पाणी देखील द्यावे लागत नाही. हे दिसायला देखील खूप सुंदर असते.
एरेका पाम रोगप्रतिकार शक्ती आणि वातावरण शुद्ध ठेवण्यासाठी फायदेशीर असते. याची पानं मोठी असतात आणि हे रोप आपण घरातील कोपऱ्यात किंवा बाल्कनीत ठेवू शकतो
पीस लिलीचे रोप देखील घरातील वातावरण शुद्ध ठेवते. हे कार्बन डाय-ऑक्साइड, अमोनिया आणि बेंजीन यांसारख्या गोष्टींना वाढ मिळते.
बाल्कनी आणि बेडरूमच्या कोपऱ्यामध्ये स्पाइंडर प्लांट ठेवू शकता. हे रोप देखील घरातील वातावरण शुद्ध ठेवते
एलोवेरा प्लांट घरातील वातावरण शुद्ध ठेवण्याबरोबरच केस आणि त्वचेसाठी फायदेशीर आहे. एलोवेरा प्लांट एखाद्या भांड्यात किंवा रोपामध्ये लावू शकता
ही रोपे उन्हात ठेवण्याची गरज नाही आणि आठवड्यातून दोन ते तीन वेळा पाणी घालावेघरातील वातावरण चांगले ठेवण्यासाठी लावा ही रोपे