Written By: Chetan Bodke
Source: Instagram
बॉलिवूड आणि टॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये पूजा हेगडेची गणना केली जाते.
आपल्या दमदार अभिनयाच्या माध्यमातून पूजाने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले.
सध्या पूजा ' रेट्रो' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. तिने प्रमोशननिमित्त खास लूक कॅरी केला असून त्यात ती खूपच सुंदर दिसते.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने तिच्या आजीची ७० वर्षे जुनी साडी नेसली आहे.
या साडीमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याने सर्वांचेच लक्ष वेधले.
कांजीवरम साडीतील सुंदर फोटोज शेअर करत अभिनेत्रीने तिच्या आजीसोबतच्या अनेक आठवणी ताज्या केल्या आहेत.
ओपन हेअर आणि केसात गजरा माळत अभिनेत्रीने त्या लूकवर पारंपारिक दागिने वेअर केले आहेत.
पूजाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये एका पेक्षा एक जबरदस्त फोटो पोजेस दिलेल्या आहेत.
अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.