Published August 24, 2024
By Shubhangi Mere
Pic Credit - Social Media
भारताचा सलामी फलंदाज शिखर धवनने निवृत्तीची घोषणा केली यानिमित्ताने त्याच्या आंतरराष्ट्रीय कामगिरीवर नजर टाका.
भारताचा सलामी फलंदाज शिखर धवनने विशाखापट्टणम येथे झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यामध्ये त्याने २० ऑक्टोबर २०१० रोजी टीम इंडियामध्ये पदार्पण केले.
शिखर धवनने २०११ मध्ये भारतीय क्रिकेट संघासाठी वेस्ट इंडिज विरुद्ध पहिला सामना खेळाला होता.
.
२०१३ मध्ये झालेल्या मोहालीमधील ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामन्यामध्ये त्याने टीम इंडियासाठी पहिला टेस्ट सामना खेळाला होता.
शिखर धवनने २०१२ मध्ये ऑस्ट्रेलियन महिला आयेशा मुखर्जीशी लग्न केले होते. त्या दोघांचा एक मुलगा देखील आहे.
शिखर धवन आणि आयेशा मुखर्जी हे २०१२ मध्ये लग्नबंधनात अडकले , त्यानंतर २०२३ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला . हे प्रकरण सोशल मीडियावर चांगलाच गाजलं होत.
धवनने आतापर्यत १६७ एकदिवसीय सामने खेळले आहेत, यामध्ये त्याने 6793 धावा केल्या आहेत. १७ शतक आणि ३९ अर्धशतकांचा समावेश आहे.
शिखर धवनने आतापर्यत ३४ कसोटी सामने खेळले आहेत, यामध्ये त्याने 2315 धावा केल्या आहेत. यात ७ शतक आणि ५ अर्धशतकांचा समावेश आहे.
भारतीय संघासाठी धवनला आतापर्यत ६८ सामन्यांमध्ये संधी मिळाली आहे, यामध्ये त्याने 1759 धावा केल्या आहेत.
भारताचा सलामी फलंदाज शिखर धवनने २४ ऑगस्ट रोजी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून निवृत्तीची घोषणा केली आहे.