Published Feb 23, 2025
By Chetan Bodke
Pic Credit - Instagram
येत्या २५ फेब्रुवारीला 'मिसमॅच' फेम अभिनेत्री प्राजक्ता कोळी आपल्या बॉयफ्रेंडसोबत लग्नबंधनात अडकणार आहे.
प्रजाक्ताच्याच्या लग्नाच्या आधीच्या विधींना सुरुवात झाली आहे. अभिनेत्रीने काही तासांपूर्वीच इन्स्टाग्रामवर मेहेंदी सोहळ्यातले फोटो शेअर केले आहेत.
सोहळ्यामध्ये अभिनेत्रीने डिझायनिंग घागरा वेअर करत सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
तर प्राजक्ताच्या होणाऱ्या पतीने व्हाईट कलरचा कुर्ता, पायजमा आणि कोट वेअर केलेला होता.
प्राजक्ताने आणि वृषांकने एकमेकांना मॅचिंग आऊटफिट घातल्यामुळे ते खूपच सुंदर दिसत होते.
येत्या २५ फेब्रुवारीला कर्जतच्या एका लक्झरियस फार्महाऊसमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत.
प्राजक्ता आणि वृषांकचे कुटुंबीय आणि दोघांच्या मित्र परिवाराला आमंत्रण आहे.
प्राजक्ता कॉलेजमध्ये असल्यापासूनच वृषांक खनालला डेट करत आहे. १३ वर्षांपासून दोघंही रिलेशनशिपमध्ये आहेत.
सध्या प्राजक्ता आणि वृषालच्या मेहेंदीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.