Written By: chetan Bodke
Source: Instagram
अभिनेत्री प्राजक्ता माळी, मराठी फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.
अभिनेत्री, निर्माती, कवियित्री आणि बिझनेस वूमन असणारी बहुआयामी प्राजक्ता तिच्या नव्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे.
प्राजक्ता माळीने काही तासांपूर्वीच इन्स्टाग्रामवर मराठमोळ्या अंदाजात खूप सुंदर फोटोशूट शेअर केले आहे.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने मराठमोळी साडी नेसून पारंपरिक दागिने वेअर करत कॅमेऱ्यासमोर सुंदर फोटोशूट केले.
गुढीपाडव्याच्या निमित्ताने प्राजक्ताने तिच्या 'प्राजक्ताराज' या गोल्डन ज्वेलरी ब्रँडसाठी नवं फोटोशूट केलं आहे.
प्राजक्ता या नव्या फोटोशूटमध्ये खूप सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करीत आहेत..
प्राजक्ताने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचं मराठमोळं सुंदर रूप आणि तितकेच आकर्षक अलंकार पाहायला मिळत आहेत.
दरम्यान, प्राजक्ता एक अभिनेत्री असून बिझनेस वूमनही आहे. तिचा 'प्राजक्ताराज' नावाचा ज्वेलरी ब्रँड आहे.
या ब्रँडच्या माध्यमातून अभिनेत्री मराठमोळे पारंपारिक दागिने बनवते आणि विकते.