Published Feb 08, 2025
By Chetan Bodke
Pic Credit - Instagram
अभिनेत्री प्राजक्ता माळी, मराठी फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.
अभिनेत्री, निर्माती, कवियित्री आणि बिझनेस वूमन असणारी बहुआयामी प्राजक्ता तिच्या नव्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे.
प्राजक्ता माळीने काही तासांपूर्वीच इन्स्टाग्रामवर काळ्या साडीतील सुंदर फोटो पोस्ट केलेत.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने गोल्डन वेलीची नक्षी असलेली स्टायलिश ब्लॅक साडी नेसली आहे.
अभिनेत्रीने ब्लॅक साडीतला लूक पूर्ण करण्यासाठी ऑक्सिडाइजचे कानातले घातले आहेत.
स्टायलिश हेअरस्टाईल, लूकला साजेसा मेकअप आणि डार्क पिंक लिपस्टिक असा लूक करत अभिनेत्रीने सुंदर फोटोशूट केले आहे.
सुंदर पोज देत प्राजक्ताने हे फोटोशूट पूर्ण केलं आहे. काळ्या साडीतील प्राजक्ताचे हे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होतायत.
इंडियन किंवा वेस्टर्न आऊटफिट कोणतेही असो अभिनेत्री एका पेक्षा एक सुंदर स्टाईल करत ती सुंदर फोटोशूट करते.
येत्या २८ फेब्रुवारी २०२५ ला प्राजक्ताचा ‘चिकी चिकी बुबूम बुम’चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ती या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.