धो धो पावसात बाईक चालवताना कोणती खबरदारी घ्याल?

Automobile

18 August, 2025

Author: मयूर नवले

संपूर्ण राजभरात धो धो पाऊस पडत आहे. 

पाऊस

Picture Credit:  Pinterest

अनेकदा या मोसमात रायडिंगचा प्लॅन बनत असतो.

रायडिंगचा प्लॅन

म्हणूनच आज आपण पावसात बाईक राईड करताना कोणत्या गोष्टी ध्यानात ठेवाव्या, त्याबद्दल जाणून घेऊयात.

खबरदारी

उत्तम क्वालिटीचे रेन-प्रूफ हेल्मेट वापरा, ज्यामुळे पावसाचे थेंब डोळ्यात  जाणार नाही.

हेल्मेटचा वापर करा

शरीर कोरडे राहिल्याने थंडी व आजार टाळता येतात आणि पकड मजबूत राहते.

रेनकोट आणि ग्लोव्हज वापरा

बाईकच्या टायरची ग्रिप चांगली आहे का? याची खात्री करून घ्या.

टायरची तपासणी करा 

अचानक ब्रेक मारल्यास बाईक स्लिप होऊ शकते, त्यामुळे दोन्ही ब्रेक योग्यरित्या वापरा.

अचानक ब्रेक मारू नका

पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचलेले असते, त्यामुळे बाईकची स्पीड नियंत्रित ठेवा.

स्पीड कमी ठेवा