गर्भवती महिलांना काही गोष्टी खाणे वर्ज्य असते

Life style

11 December, 2025

Author:  नुपूर भगत

कच्ची अंडी, अर्धवट शिजलेले मांस, कच्ची मासळी यामध्ये जंतुसंसर्गाचा धोका जास्त असतो. त्यामुळे हे पदार्थ पूर्णपणे शिजवूनच खावेत.

कच्चे अन्न

Picture Credit: Pinterest

जास्त चहा, कॉफी, एनर्जी ड्रिंक्स किंवा कॅफिनयुक्त पेय गर्भाच्या वाढीवर परिणाम करू शकतात. दिवसाला 1–2 कपांपेक्षा जास्त टाळणे उत्तम.

जास्त प्रमाणात कॅफिन

Picture Credit: Pinterest

चिप्स, बिस्किट्स, फ्रोजन फूड्स, कोल्ड ड्रिंक्स यामध्ये साखर, मीठ आणि प्रिझर्व्हेटिव्ह जास्त असतात आणि पोषण कमी असते.

पॅकेज्ड आणि जंक फूड

Picture Credit: Pinterest

कच्च्या पपईत लेटेक्स तर अननसमध्ये काही घटक गर्भाशय आकुंचनाची शक्यता वाढवू शकतात. 

पपई आणि अननस 

Picture Credit: Pinterest

अल्कोहोल आणि सिगारेटमधील घटक गर्भाच्या मेंदू आणि अवयवांच्या विकासाला हानी पोहोचवतात. 

 मद्यपान आणि धूम्रपान

Picture Credit: Pinterest

हे पदार्थ पचनावर ताण आणतात आणि ॲसिडिटी, गॅस, उलट्या यांसारख्या त्रासात वाढ करतात. 

तेलकट-मसालेदार पदार्थ

Picture Credit: Pinterest

साध्या सर्दीच्या गोळ्या, वेदनाशामक किंवा कोणत्याही प्रकारची औषधे डॉक्टरांचा सल्ला न घेता घेऊ नयेत. 

 औषधे स्वतःहून घेणे

Picture Credit: Pinterest