हिंदू धर्मामध्ये पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. वर्षभरात 12 पौर्णिमा येतात. या तिथीला खूप शुभ मानले जाते.
पौर्णिमेच्या दिवशी चंद्रासोबत महादेव आणि पार्वती लक्ष्मीनारायण यांची पूजा केल्याने धन वैभव वाढते.
पौर्णिमेच्या दिवशी जन्मलेल्या लोकांचा स्वभाव कसा असतो जाणून घ्या
ज्योतिषशास्त्रानुसार पौर्णिमेला जन्मलेले लोक खूप भाग्यशाली असतात
मान्यतेनुसार पौर्णिमेच्या दिवशी हनुमानाचा जन्म झाला होता. तसेच पौर्णिमेच्या दिवशी 18 पुराणाची रचना करणारे वेद व्यास यांचा देखील जन्म झाला होता.
धार्मिक मान्यतेनुसार पौर्णिमेच्या दिवशी जन्मलेले लोक सुंदर असतात.
या दिवशी चंद्र पूर्ण दिसतो. याचा प्रभाव या दिवशी जन्मलेल्या लोकांवर पडतो
पौर्णिमेच्या दिवशी जन्मलेले लोक खूप मेहनत घेणारे असतात. सोबतच बुद्धिमान देखील असतात. हे लोक करियरमध्ये खूप प्रगती करतात
पौर्णिमेच्या दिवशी जन्मलेले लोकांची आर्थिक स्थिती चांगली असते. या लोकांना कधीही पैशाची कमतरता भासत नाही.