पंजिरी कशी तयार करायची? 

Life style

2 January 2026

Author:  नुपूर भगत

कढईत 2 टेबलस्पून तूप गरम करून त्यात डिंक घालून फुलवून घ्या. फुललेला डिंक थंड करून जाडसर कुटून बाजूला ठेवा.

डिंक तळणे

Picture Credit: Pinterest

त्याच कढईत थोडे तूप घालून बदाम आणि काजू हलके गुलाबी होईपर्यंत परतून घ्या व बाजूला काढा.

 सुकामेवा भाजणे

Picture Credit: Pinterest

कढईत उरलेले तूप घालून गव्हाचे पीठ मंद आचेवर सतत ढवळत सोनेरी रंग येईपर्यंत भाजा. छान सुगंध आला पाहिजे.

पीठ भाजणे

Picture Credit: Pinterest

भाजलेले पीठ पूर्णपणे थंड होऊ द्या. गरम असताना साखर घालू नका.

थंड होऊ देणे

Picture Credit: Pinterest

थंड झालेल्या पिठात पिठीसाखर घालून चांगले मिसळा.

साखर मिसळणे

Picture Credit: Pinterest

त्यात भाजलेला सुकामेवा, कुटलेला डिंक आणि वेलची पूड घालून व्यवस्थित एकजीव करा.

सुकामेवा आणि डिंक 

Picture Credit: Pinterest

तयार पंजीरी हवाबंद डब्यात भरा. रोज 1–2 चमचे दूध किंवा कोमट पाण्यासोबत घ्या.

हवाबंद डब्यात साठवा

Picture Credit: Pinterest