हिंदू धर्मामध्ये पुत्रदा एकादशीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी विधिवत भगवान विष्णूंची पूजा केली जाते. यावर्षी पुत्रदा एकादशी 30 डिसेंबर रोजी साजरी केली जाणार आहे.
पुत्रदा एकादशीच्या दिवशी या गोष्टींचे चुकूनही दान करू नका. कोणत्या आहेत त्या गोष्टी जाणून घ्या
जर तुम्ही जुने फाटलेले कपड्यांचे दान केले तर घरातील सकारात्मक ऊर्जा दूर होईल आणि नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकते.
पौष पुत्रदा एकादशीच्या दिवशी प्लास्टिकच्या वस्तूंचे दान करू नये. यामुळे तुमची काम अडकू शकतात. त्याशिवाय तुमची प्रगतीही होणार नाही.
हिंदू धार्मिक ग्रंथानुसार कधीही शिळ्या अन्नाचे दान करू नये. त्यामुळे तुम्हाला जीवनात अनेक समस्या येऊ शकतात
पुत्रदा एकादशीच्या दिवशी चाकू, कैची आणि यांसारख्या धारदार वस्तूंचे दान केल्याने घरामध्ये कलह होऊ शकतो.
पुत्रदा एकादशीच्या दिवशी या गोष्टींनी व्यक्तिरिक्त पिवळ्या रंगांचे वस्त्र, केळ, केसर, चण्याची डाळ, गूळ आणि पिवळ्या रंगाचे फूल दान करावे. यामुळे तुम्हाला नशिबाची साथ मिळेल