झटपट पालक पत्ता  चाट रेसिपी

Life style

28 December, 2025

Author:  नुपूर भगत

ताजी, मोठी पालकाची पाने घ्या. देठ काढून पाने स्वच्छ धुवा आणि कोरडी पुसून घ्या.

पालकाची पाने धुवा

Picture Credit: Pinterest

एका भांड्यात बेसन, तांदळाचे पीठ, मीठ, लाल तिखट व थोडे पाणी घालून घट्टसर पीठ तयार करा.

पीठ तयार करा

Picture Credit: Pinterest

प्रत्येक पालकाचे पान या पिठात बुडवून घ्या, जेणेकरून पानावर व्यवस्थित लेप बसेल.

पालक पिठात बुडवा

Picture Credit: Pinterest

कढईत तेल गरम करून ही पाने मध्यम आचेवर सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.

तेलात भजी तळा 

Picture Credit: Pinterest

सर्व्हिंग प्लेटमध्ये तळलेली पाने ठेवा. त्यावर फेटलेले दही, हिरवी चटणी आणि चिंचेची गोड चटणी घाला.

दही घाला

Picture Credit: Pinterest

शेवटी चाट मसाला, जिरेपूड, लाल तिखट घालून चाटला छान सजवा.

मसाले घाला 

Picture Credit: Pinterest

तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यावर बारीक चिरलेला कांदा आणि डाळिंबाचे दाणे देखील घालू शकता.

चिरलेला कांदा

Picture Credit: Pinterest