श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीला पुत्रदा एकादशी म्हटले जाते. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते
मान्यतेनुसार, या दिवशी उपवास केल्याने संतती होण्याची शक्यता निर्माण होते. या एकादशीला पवित्रोपना किंवा पवित्र एकादशी या नावाने देखील ओळखले जाते
यावेळी पुत्रदा एकादशी 5 ऑगस्ट रोजी आहे. या दिवशी कोणत्या ठिकाणी दिवा लावावा, जाणून घ्या
एकादशीच्या दिवशी तुळशीजवळ दिवा लावणे खूप शुभ मानले जाते. कारण भगवान विष्णूंना तुळस खूप आवडते.
या दिवशी सूर्यास्तानंतर तुळशीजवळ तुपाचा दिवा लावावा. यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात आनंदाचे वातावरण राहते
एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावणे शुभ मानले जाते. याचे चांगले परिणाम मिळतात असे म्हटले जाते
एकादशीच्या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दिवा लावणे शुभ मानले जाते. सूर्यास्तानंतर दिवा लावावा.
मुख्य प्रवेशद्वाराजवळ दिवा लावल्याने घरामध्ये देवी लक्ष्मी प्रवेश करते, असे मानले जाते. त्यामुळे घरामध्ये कधीही पैशाशी कमतरता भासत नाही.
पुत्रदा एकादशीच्या दिवशी स्वयंपाकघरात दिवा तुपाचा लावणे शुभ मानले जाते. यामुळे धनधान्याची कमतरता भासत नाही.