Gen Z आणि Millennials अलीकडे Rage Booking करत असून हा ट्रेंड सध्या जोरदार चर्चेत आहे
कामाचा ताण, आयुष्यातील नैराश्य किंवा रागाच्या भरात एखादी व्यक्ती ट्रिप प्लॅन करते त्याला Rage Booking असे म्हणतात
कामाचा ताणामुळे तरुणाईला वैयक्तिक आयुष्यासाठी वेळ मिळत नसल्याने हा ट्रेंड प्रचंड वाढत आहे
तरुणांच्या मते, Rage Booking केल्यामुळे त्यांच्या कामाचा ताण कमी होत आहे
तरुण मंडळी कोणतेही प्लॅनिंग न करता थेट बुकिंग करून स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर करत राग व्यक्त करत आहेत
पण तरुणाई रागाच्या भरात महागडे होटेल्स, रिसॉर्ट, ठिकाणे बुक करत आहेत
तज्ज्ञांच्या मते, वातावरण बदल्यामुळे ताण कमी होण्यास मदत होते, यामुळेच Gen Z मध्ये हा ट्रेंड व्हायरल होत आहे