जर कुंडलीमध्ये राहूची स्थिती खराब असल्यास राहू दोष उद्भवतो. या दोषामुळे जीवनामध्ये अडचणी, समस्या येतात.
राहू हा एक छाया ग्रह आहे. ज्यांच्या कुंडलीमध्ये राहूची अशुभ स्थिती आहे त्यांना मानसिक तणाव, आरोग्याच्या समस्या, आर्थिक अडचण येते.
मंगळवार किंवा शनिवारी हनुमान चालिसेचे 11 वेळा पठण करावे त्यामुळे कुंडलीत राहूची असलेली नकारात्मकता दूर होण्यास मदत होते.
शनिवारी राहू यंत्राची स्थापना करा आणि त्याची नियमित पूजा करा. याला घराच्या उत्तर पूर्व दिशेला ठेवा आणि मंत्रांचा जप करा.
शनिवारच्या दिवशी काळ्या तिळाचे दान करा किंवा ते गरिबांमध्ये वाटा. या उपायामुळे राहू ग्रह शांत होतो आणि आर्थिक समस्या दूर होतात
शनिवारी चांदीच्या अंगठीत गोमेद रत्न धारण केल्यास राहूच्या प्रभावावर नियंत्रण ठेवणे सोपे जाते.
शुक्रवारी देवी सप्तशतीचे पठण करावे. ओम राहवे नमः या मंत्रांचा 108 वेळा जप करावा. यामुळे मानसिक शांती लाभते.
राहूचा उपाय करताना पहिले ज्योतिषाचा सल्ला घ्या. यावेळी मांसाहार, तामासिक अन्नाचे सेवन करु नका
अचानक नुकसान होणे, मानसिक तणाव, झोप न येणे आणि नात्यात तणाव निर्माण होणे ही लक्षणे राहू दोषाची असू शकतात.