Published 9, Dec, 2024
By Narayan Parab
Pic Credit - Social Media
15 व्या विधानसभेचे अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड झाली.
राहुल नार्वेकर यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड झाली आहे. जाणून घेऊया त्यांची कारकीर्द
राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेमधून राजकारणाची सुरुवात केली
2014 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. मावळ लोकसभा निवडणुक लढवली मात्र त्यात त्यांचा पराभव झाला.
राहुल नार्वेकर हे 2016 मध्ये त्यांची पहिल्यांदा विधानपरिषदेवर निवड झाली होती.
त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत 2019 मध्ये कुलाब्यातून विजयी होत. ते विधानसभेवर आमदार झाले.
2022 मध्ये त्यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली होती. त्यांनी अडीच वर्षे या पदाचा कार्यभार सांभाळला.
.
आता झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी कुलाबा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्क्याने पुन्हा विजय मिळवला.
.