बहिणींनी प्रथम या देवांना राखी बांधणे असते फायदेशीर

Life style

02 August, 2025

Author:  प्राजक्ता प्रधान

हिंदू धर्मामध्ये रक्षाबंधनाचा सण पवित्र मानला जातो. यावेळी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते.

पवित्र सण

रक्षाबंधनाच्या दिवशी भावांना राखी बांधण्याला महत्त्व आहे. मात्र, या दिवशी भावाव्यतिरिक्त, तुम्ही देवांनाही राखी बांधू शकता.

देवतांना राखी बांधणे

रक्षाबंधनाच्या दिवशी सकाठी उठून आवरुन झाल्यानंतर गणपती बाप्पाला राखी बांधावी, त्यामुळे तुमच्या जीवनातील अडथळे  दूर होतात.

गणपती बाप्पा

नेहमी संरक्षण करणारे

मान्यतेनुसार तुम्ही गणपती बाप्पाला राखी बांधल्यास तो आपल्याला बहीण मानून सदैव रक्षण करतो.

भगवान शिव

श्रावणामध्ये रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. यावेळी रक्षाबंधाच्या दिवशी शिवलिंगावर राखी अर्पण करु शकता

हनुमानाला राखी बांधणे

रक्षाबंधाच्या दिवशी हनुमानाला राखी बांधल्याने तुमच्या कुंडलीमधील मंगळाचा प्रभाव कमी होतो.

कान्हाला राखी बांधणे

रक्षाबंधाच्या दिवशी कान्हा राखी बांधून तुम्ही त्यांचा आशीर्वाद मिळवू शकता. श्रीकृष्णाचे बोट कापले गेले त्यावेळी द्रौपदीने लगेच तिच्या साडीचा पदर थोडा फाडून त्याच्या बोटावर बांधला होता. 

श्रीकृष्णाने केले होते रक्षण

ज्यावेळी द्रौपदीचे वस्त्रहरण केले जात होते, त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने तिचे रक्षण केले होते.

नाग देवता

रक्षाबंधाच्या दिवशी नागदेवतेला राखी अर्पण केल्यास व्यक्तीच्या कुंडलीमधील सर्प दोष दूर होतो.