यंदाच्या रक्षाबंधनाला पारंपरिक राख्यांसोबत ज्वेलरी स्टाइल राख्यांचीही क्रेझ पाहायला मिळत आहे.
Picture Credit: Pinterest
आता राखीमध्ये फक्त रंगीत धागा नाही, तर मोती, कुंदन, स्टोन आणि मेटलचे आकर्षक डिझाइन्स पाहायला मिळतात.
Picture Credit: Pinterest
भावाच्या कपड्यांनुसार राखी निवडता येते. ट्रेडिशनल कुर्ता असो किंवा कॅज्युअल लूक, प्रत्येकासाठी खास डिझाइन उपलब्ध आहेत.
Picture Credit: Pinterest
कुंदन वर्क असलेली राखी रॉयल लूक देते. पारंपरिक आणि मॉडर्न स्टाइलचा सुंदर मिलाफ हवा असेल तर हा पर्याय खास!
Picture Credit: Pinterest
ब्रेसलेटसारखी दिसणारी राखी तरुणांमध्ये लोकप्रिय ठरते आहे. साधी, आकर्षक आणि रक्षाबंधनानंतरही वापरता येईल अशी स्टाइल.
Picture Credit: Pinterest
Picture Credit: Pinterest
मोत्यांची नाजूक राखी भावाच्या मनगटावर आकर्षक लूक देते. साधेपणात स्टाइल हवी असेल तर हा पर्याय निवडू शकता.
Picture Credit: Pinterest
फोटो, नाव, आद्याक्षर किंवा खास संदेश असलेली पर्सनलाइज्ड राखीही यंदा खास आकर्षण ठरत आहे.
Picture Credit: Pinterest
यंदा राखी हा केवळ रक्षासूत्राचा भाग न राहता फॅशन आणि भावनेचा सुंदर संगम बनला आहे. तुमच्या भावासाठी तुम्ही कोणती राखी निवडणार?