रक्षाबंधनासाठी बनवा घरच्या घरी शाही तुकडा; सोपी आहे रेसिपी

Life style

25 August 2026

Author:  नुपूर भगत

कढईत दूध घेऊन मध्यम आचेवर गरम करा. दूध थोडे घट्ट होईपर्यंत सतत ढवळत राहा.

दूध आटवून घ्या

Picture Credit: Pinterest

दूध आटल्यावर त्यात साखर, कंडेन्स्ड मिल्क, केशर, वेलची पूड घाला. काही मिनिटे शिजवून घट्टसर रबडी बनवा. शेवटी गुलाबपाणी घालून गॅस बंद करा.

बडी तयार करा

Picture Credit: Pinterest

ब्रेडच्या स्लाइसचे कडे कापून काढा आणि प्रत्येक स्लाइसचे त्रिकोणी किंवा चौकोनी तुकडे करा.

ब्रेडचे तुकडे करा

Picture Credit: Pinterest

तव्यावर तूप गरम करून ब्रेडचे तुकडे दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.

 ब्रेड भाजून घ्या

Picture Credit: Pinterest

काजू, बदाम आणि पिस्त्याचे बारीक काप करून घ्या. हवे असल्यास थोड्या तुपात ते हलके भाजून घेऊ शकता.

 सुकामेवा तयार करा

Picture Credit: Pinterest

एका सर्व्हिंग प्लेटमध्ये भाजलेले ब्रेडचे तुकडे मांडून त्यावर तयार केलेली गरम किंवा कोमट रबडी व्यवस्थित पसरवा.

शाही तुकडा सजवा

Picture Credit: Pinterest

वरून काजू, बदाम, पिस्ता आणि थोडे केशर घालून शाही तुकडा सजवा. रक्षाबंधनाच्या दिवशी हा स्वादिष्ट गोड पदार्थ थंड किंवा कोमट सर्व्ह करा.

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest