Published Dec 2, 2024
By Harshada Jadhav
Pic Credit - pinterest
स्त्रिया आपले सौंदर्य अधिक वाढवण्यासाठी लिपस्टिक वापरतात.
प्रत्येक महिला तिच्या आवडीनुसार लिप्स्टिकची शेड निवडते.
अनेक महिला स्वत:साठी लाल रंगाच्या लिप्स्टिकची निवड करतात. लाल रंगामुळे आत्मविश्वास वाढतो.
पण असा एक देश आहे जिथे महिलांना लाल लिपस्टिक लावण्याची परवानगी नाही.
या देशाचं नाव आहे उत्तर कोरिया.
या देशात लाल लिपस्टिक आणि मेकअप, फॅशनशी संबंधित अनेक गोष्टींवर बंदी आहे.
या नियमांचं उल्लंघण केल्यास कठोर शिक्षा दिली जाते.
उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन लाल रंगाला भांडवलशाही आणि व्यक्तिवादाशी जोडतो.
याच कारणामुळे लाल लिपस्टिकवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
येथे महिला फक्त हलक्या रंगाच्या लिपस्टिक लावू शकतात.
नियमांचे योग्य पालन व्हावे यासाठी देशभरात पेट्रोलिंग टीम तैनात करण्यात आली आहे.