Published August 17, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
एखाद्यावर प्रेम करताना त्याचं अचानक आयुष्यातून निघून जाणं हे मानसिकदृष्ट्या तोडून टाकणारं असतं
यावेळी भावनात्मकरित्या तुटून जाणं हे साहजिक आहे मात्र यातून कसे बाहेर पडायचे हे महत्त्वाचे आहे
.
नुकतेच तुमचे ब्रेकअप झाले असेल तर तुम्ही यातून कसे बाहेर पडू शकता यासाठी सोप्या टिप्स
ब्रेकअप झाल्यावर अजिबात तुमच्या एक्ससह संपर्क ठेऊ नये. बोलणं, टेक्स्ट करणं, सोशल मीडियावर स्टॉक करणं बंद करा
अनेकदा ब्रेकअपनंतरही मैत्रीचं नातं ठेवलं जातं मात्र तितकाही संपर्क ठेवणं योग्य नाही
अनेकदा स्वतःला दोषी ठरवलं जातं. मात्र असं अजिबात करू नका आणि त्यातून शिकण्याचा प्रयत्न करा
यातून बाहेर पडण्यासाठी स्वतःला वेळ द्या आणि जास्तीत जास्त व्यस्त राहा
ब्रेकअप झाल्यानंतर त्वरीत दुसऱ्या नात्याचा विचार करणं योग्य ठरणार नाही
दुसऱ्या जोड्यांसह स्वतःची तुलना करून स्वतःला त्रास करून घेऊ नका