श्रावण महिन्यात महिला हातावर मेहंदी का काढतात

Lifestyle

13 August 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

सौभाग्याचे प्रतीक 

अनेक पारंपरिक मान्यतांनुसार मेहंदी ही सौभाग्य, प्रेम आणि समृद्धीचे प्रतीक मानली जाते. विशेषतः विवाहित महिला श्रावणातील सण आणि मंगळागौरीच्या निमित्ताने मेहंदी काढतात.

Picture Credit: Pinterest

श्रावणामध्ये मेहंदी काढणे शुभ मानले जाते. केदारनाथ मंदिर, झोका घेणाऱ्या मुली अशा विविध प्रकारच्या मेहंदी काढता येऊ शकते. तसेच साधी सोपी डिझाइन देखील काढता येऊ शकते.

कोणत्या प्रकारची मेहंदी काढावी

Picture Credit: Pinterest

भारतीय संस्कृतीत मेहंदीला शुभ आणि मांगलिक मानले जाते. त्यामुळे सण, व्रत आणि धार्मिक प्रसंगी महिला हातांवर मेहंदी काढतात. श्रावणातील व्रत-वैकल्यांमध्येही या परंपरेला विशेष स्थान आहे.

मेहंदीला शुभ मानले जाते

Picture Credit: Pinterest

केदारनाथ मंदिर हातांवर काढू शकता. केदारनाथ मंदिर काढून त्याच्या आजूबाजूने केलेले बारीक नक्षीकाम अतिशय उठावदार दिसेल.

केदारनाथ मंदिर

Picture Credit: Pinterest

श्रावण महिन्यात अनेक गावांमध्ये वडाच्या झाडाला झोके घेण्याची परंपरा आहे. त्यामुळे तुम्हीसुद्धा हातांवरील मेहेंदीमध्ये सुंदर झोका घेणाऱ्या मुलीची डिझाईन काढू शकता.

झोका घेणाऱ्या मुली

Picture Credit: Pinterest

मंगळागौर आणि मेहंदी

Picture Credit: Pinterest

श्रावणातील मंगळवार महिलांसाठी विशेष महत्त्वाचे असतात. मंगळागौर पूजेदरम्यान महिला पारंपरिक वेशभूषा, हिरव्या बांगड्या आणि मेहंदीने नटतात. त्यामुळे श्रावण आणि मेहंदी यांचे नाते अधिक घट्ट झाले आहे.

हात-पायांना थंडावा आणि आराम

Picture Credit: Pinterest

पारंपरिक वापरामध्ये मेहंदी हात-पायांवर लावल्याने थंडावा आणि आराम मिळतो, अशी धारणा आहे. श्रावणातील धार्मिक कार्यक्रमांमध्ये मेहंदी लावण्याची ही पद्धत सौंदर्य आणि पारंपरिक उपयोग यांचा सुंदर संगम मानली जाते.

श्रावणातील मेहंदीची परंपरा

Picture Credit: Pinterest

श्रावणात मेहंदी काढणे म्हणजे केवळ हात सजवणे नाही, तर श्रावणातील भक्ती, सणांचा उत्साह आणि भारतीय संस्कृतीतील सौंदर्यपरंपरेचा अनुभव घेणे आहे.