केसांचा राठपणा दूर करून चमक वाढवतील या गोष्टी

Lifestyle

21 june 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

केसांचा निस्तेजपणा

जेव्हा क्यूटिकल, म्हणजेच केसांचा वरचा थर, खराब होतो, तेव्हा ते आपला नैसर्गिक ओलावा गमावतात. यामुळे केसांची चमक कमी होते आणि ते कोरडे व कमजोर दिसू लागतात.

Picture Credit: Pinterest

केस गरम पाण्याने धुणे, उष्णता देणाऱ्या साधनांचा अतिवापर, क्षारयुक्त पाणी, तीव्र सूर्यप्रकाश आणि पोषक तत्वांची कमतरता यांसारख्या कारणांमुळे केस कोरडे होतात.

केस कोरडे होण्याची कारणे

Picture Credit: Pinterest

केसांना अंड लावल्याने मुलायम आणि चमकदार बनतात. कारण यामध्ये प्रथिने असतात. आठवड्यातून एकदा अंड्याचा पॅक बनवून लावू शकता.

अंड

Picture Credit: Pinterest

दही

केस मऊ करण्यासोबतच नैसर्गिक चमक आणि कोंडा कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. यामध्ये नैसर्गिक घटक असतात.

Picture Credit: Pinterest

कोरफडीचा गर घरात सहज उपलब्ध असतो. हे केसांना मऊ आणि चमकदार बनवतात. यासोबतच हे केसांना पोषण देऊन मजबूत करण्याचे काम करते.

कोरफड

Picture Credit: Pinterest

शिया बटर

Picture Credit: Pinterest

शिया बटर हा एक नैसर्गिक घटक आहे जो गळलेले केस पुन्हा उगवण्यास मदत करतो. तसेच, तो एक नैसर्गिक कंडिशनर म्हणूनही काम करतो.  

मेथीचे दाणे

Picture Credit: Pinterest

केस मजबूत करण्यासाठी, केसांची वाढ वाढवण्यासाठी आणि त्यांना मऊ व चमकदार बनवण्यासाठी मेथीच्या दाण्यांचा वापर करावा. हे पाण्यात भिजवा आणि वाटून घ्या. हे केसांना लावा. याच्या पाण्याचा वापर केसांसाठी करू शकता.