एका भांड्यात पाणी उकळून त्यात सोया चंक्स टाका आणि 5 मिनिटे शिजू द्या. नंतर पाणी काढून चंक्स हाताने पिळून कोरडे करा.
Picture Credit: Pinterest
एका भांड्यात कॉर्नफ्लोअर, मीठ, मिरची पूड आणि थोडं पाणी घालून पेस्ट तयार करा. त्यात सोया चंक्स घालून हलकेसे मिक्स करा.
Picture Credit: Pinterest
कढईत तेल गरम करून हे सोया चंक्स कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या आणि बाहेर काढा.
Picture Credit: Pinterest
त्याच कढईत थोडं तेल ठेवून आले-लसूण पेस्ट, कांदा, ढोबळी मिरची आणि हिरवी मिरची परतून घ्या.
Picture Credit: Pinterest
आता त्यात सोया सॉस, व्हिनेगर आणि टोमॅटो सॉस घालून चांगलं मिक्स करा.
Picture Credit: Pinterest
तळलेले सोया चंक्स या मिश्रणात टाकून सगळं चांगलं हलवा, जेणेकरून सॉस प्रत्येक चंक्सला लागेल.
Picture Credit: Pinterest
थोडी कोथिंबीर टाकून गॅस बंद करा. गरमागरम सोया चिली तयार आहे.
Picture Credit: Pinterest