Published Sept 16, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
देशी पिठाने मिळवा चमकदार कोरियन स्किन
जगभरात कोरियन त्वचा ही डागविरहीत आणि सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. अशी त्वचा सर्वांनाच हवी असते
हेल्दी आणि सुंदर त्वचेसाठी अनेक उपाय केले जातात, ज्यामध्ये तांदळाच्या पिठाचाही समावेश आहे
तुम्हालाही कोरियन स्किन हवी असेल तर तांदळाचा फेसपॅक त्वचेवर वापरू शकता
.
तांदळाच्या पिठामुळे त्वचेवर अधिक चमक येते आणि डार्क स्पॉट्स कमी होतात
.
एका वाटीत तांदळाचं पीठ आणि दूध मिक्स करून घ्या. हे मिश्रण चेहऱ्याला लावा आणि 15 मिनिट्सने धुवा
चेहऱ्यावरील जमा झालेली घाण या मिश्रणामुळे निघून जाण्यास मदत मिळते आणि डेड स्किनही निघते
2 चमचे कोरफड जेल आणि 1 चमचा तांदळाचं पीठ मिक्स करा. हा फेसपॅक 20 मिनिट्स चेहऱ्यावर लावा आणि धुवा
तांदूळ आणि गव्हाचं पीठ मिक्स करून त्यात टॉमेटोचा रस आणि बटाट्याची सालं मिक्सरमधून काढून टाका
हा तयार केलेला फेसपॅक चेहऱ्यावर लावा आणि सुकल्यावर थंड पाण्याने धुवा आणि परिणाम पाहा
चमकदार त्वचेसाठी कोणताही पदार्थ वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करा, आम्ही कोणताही दावा करत नाही